नवी दिल्ली : पश्चिम बंगाल पोलिसांनी शुक्रवारी कोलकातामधील बुर्राबाजार परिसरात एका गेस्ट हाऊसवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
स्थानिक नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत ही छापेमारी केली आहे. मात्र, यावेळी आरोपी प्रमोद सिंघानिया याला एका सुरुंगाच्या माध्यमातून पळ काढण्यात यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती की, इमारतीचा मालक प्रमोद कुमार सिंघानिया हा सेक्स रॅकेट चालवतो. प्रमोद कुमार सिंघानिया हा कथित रुपात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याचा अनुयायी आहे.
आरोपी प्रमोद सिंघानिया याने इमारतीत एक सुरुंग बनवलं होतं. पोलिसांनी कारवाई करताच या सुरुंगाच्या माध्यमातून पळ काढता यावा यासाठीच हा सुरुंग तयार करण्यात आला होता.
रिपोर्टनुसार, या परिसरात १० बाय १० च्या आकारात लाकडापासून तयार करण्यात आलेले २५ वुडन केबिनही आढळल्या. या केबिनमध्ये बेडही होते. ही घटना २५ डिसेंबर रोजी उघडकीस आली ज्यावेळी स्थानिकांनी एका केबिनमध्ये आपत्तिजनक परिस्थितीत एका जोडप्याला पाहिलं होतं.
या घटनेनंतर स्थानिकांनी लाकडांच्या केबिन्स तोडल्या होत्या आणि सिंघानियाचा विरोध केला होता. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सिंघानिया आणि काही अल्पवयीन मुलींनी सुरुंगाच्या माध्यमातून तेथून पळ काढला.
एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, आम्ही इमारतीत प्रवेश केला त्यावेळी तेथे देह व्यापार सुरु असल्याचं आम्हाला दिसलं. त्या ठिकाणी अल्पवयीन मुलं आणि मुलीही होत्या. आरोपी सिंघानिया याला आम्ही पकडणार तोवर त्याने सुरुंगच्या माध्यमातून पळ काढला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. मात्र, अद्यापही आरोपी प्रमोद कुमार सिंघानिया हा फरार आहे.