नवी दिल्ली : भारतात मुलींच्या विवाहासाठी योग्य वय १८ वर्ष तर मुलांसाठी २१ वर्ष असणं बंधनकारक होतं. पण आता देशात लग्नासाठी मुलींचं वय १८ वर्षांवरून २१ वर्ष करण्यात येवू शकतं. त्यामुळे देशातील मुलींच्या जीवनात अनेक बदल होवू शकतात. भारत सरकारकडून मुलींच्या विवाहासाठी नवी वयोमर्यादा काय असावी यावर पुन्हा एकदा विचार करण्यात येणार आहे. तसे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या आपल्या संबोधनात दिलेत.
We have set up committee to reconsider the minimum age for marriage of our daughters. We will take appropriate decision after the committee submits its report: PM Narendra Modi #IndependenceDay pic.twitter.com/vXSyDlsq2x
— ANI (@ANI) August 15, 2020
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादेवर पुन्हा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. समितीने संबंधित अहवाल सादर केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.' असं यावंळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं.
मातृ मृत्यूदर कमी करण्यासाठी मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याचा विचार केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानंही यासंदर्भात केंद्राला निर्देश दिले होते. शिवाय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी आपल्या मागच्या अर्थसंकल्पीय भाषणात महिलेला आई बनण्याच्या योग्य वयाबद्दल सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स बनवण्यात येणार असल्याचं सांगितले होते.