धुलिवंदनाआधीच शेअर बाजार रंगला हिरव्या रंगात; सेंसेक्स 58 हजाराच्या पार

Share Market | धुलिवंदनाआधीच भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे रंग उधळल्याचे दिसून येत आहेत. शेअर मार्केटमध्ये सलग काही दिवसांपासून तेजीचा माहोल दिसत आहे

Updated: Mar 17, 2022, 02:56 PM IST
धुलिवंदनाआधीच शेअर बाजार रंगला हिरव्या रंगात; सेंसेक्स 58 हजाराच्या पार title=

मुंबई : धुलिवंदनाआधीच भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे रंग उधळल्याचे दिसून येत आहेत. शेअर मार्केटमध्ये सलग काही दिवसांपासून तेजीचा माहोल दिसत आहे. अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर देखील जगभरातील शेअर बाजारात तेजी नोंदवली गेली.

धुलिवंदनाआधीच भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवली गेली. अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदरे वाढवल्यानंतर जगभरातील इक्विटी बाजारात तेजी दिसून आली. मार्केट उघडताच सेंसेक्स 850 अंकांची नोंदवली गेली. 

कच्चे तेलाचे घटले दर

परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि कच्च्या तेलाचे घसरलेल्या दरांमुळे शेअर बाजारात तेजी नोंदवली जात आहे. दुपारी २.३० वाजेपर्यंत सेंसेक्स 1184 अंकांच्या तेजीसह 58000 च्या पातळीवर ट्रेड करीत होता. त्याच वेळी निफ्टी देखील 343 अंकांच्या तेजीसह 17319वर ट्रेड करीत होता.

बहुतांश शेअर हिरव्या रंगात

सेंसेक्समध्ये बहुतांश शेअर हिरव्या रंगात रंगले होते असं म्हणता येईल. म्हणजेच बहुतांश शेअर तेजीत होते. एचडीएफसी बँकेचा शेअरमध्ये ३ टक्क्यांची तेजी नोंदवली गेली. आशियाई बाजारात हॉंगकॉंग टोकिओमध्ये तेजी दिसून आली आहे. 

दोन दिवसात 8 लाख कोटींचा फायदा

बाजाराच्या दिवसांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. दोन दिवसात गुंतवणूकदारांना ८ लाख कोटींचा फायदा झाला आहे.