पैसे, सोने आणि बरंच काही...; पाकिस्तानातून किती रक्कम घेऊन आली सीमा हैदर?

Sachin-Seema Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. भारतात येण्यासाठी सीमाने काय काय जुगाड केले हे एकदा वाचाच   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 13, 2023, 03:20 PM IST
पैसे, सोने आणि बरंच काही...; पाकिस्तानातून किती रक्कम घेऊन आली सीमा हैदर? title=
Seema haider from Pakistan took 7 lakhs from her husband

Seema Haider News: पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. भारतासह पाकिस्तानातही सीमा हैदर ही चर्चेत आली आहे. पबजी खेळत असताना सीमा आणि सचिन यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सचिनसोबत लग्न करण्यासाठी तिने पाकिस्तानसोडून थेट भारत गाठले. मात्र सीमा हैदर भारतात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

सचिनसोबत लग्न करण्याची स्वप्न पाहत सीमा भारतात आली. मात्र, येताना सोबत तिची चार मुलंही घेऊन आली. २७ वर्षांच्या सीमाला तिच्या पहिल्या पतीपासून चार मुलं आहेत. तिच्या चारही मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी सचिनने घेतली आहे. मात्र, सीमाच्या पहिल्या पतीने याला विरोध केला आहे. माझ्या मुलांना परत पाठवून दे, असं त्याने म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर सीमाच्या सासऱ्यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

सीमा आणि सचिनने आता लग्न केले आहे. लग्नानंतर तिने मुलांचीही नावं बदलली आहेत. तसंच, तिने हिंदू धर्माचे पालन करण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र, सीमा पाकिस्तानातून भारतात येताना तिने घरातून पैसे व सोने आणल्याचा आरोप केला जात आहे. सीमाचे सासरे मीर जान जखरानी यांनी केलेल्या आरोपांनुसार सीमाने घर विकून सगळं सामान एका भाड्याच्या घरात ठेवलं आहे. तसंच, घर विकून आलेले सर्व पैसे आणि सात तोळे सोने घेऊन ती पाकिस्तानातून भारतात पळून आली आहे. 

सीमाने या आरोपांवर उत्तर दिलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिचे पती गुलाम हैदर तिला सौदीतून सात लाख पाठवले होते. ते पैसे आणि सोनं घेऊन ती भारतात आली आहे. तसंच, पतीला सौदीत पाठवण्यासाठी तिने सोने गहाण ठेवलं होतं. व पती मुलांसाठी जे पैसे पाठवत होते त्यातूनच तिने घर खरेदी केले होतं. 

सीमाने म्हटलं आहे की, तिने विकलेले घर तिचे स्वतःचे आहे. 12 लाखांत सीमाने घर विकले आहे. त्याच पैशाच्या उपयोग तिने भारतात येण्यासाठी केला होता. ती मेमध्ये मुलांसोबत नेपाळला गेली होती. त्यासाठी तिकिटांचा खर्च 6 लाख रुपये झाला होता. त्यानंतर दुबईहून ती काठमांडूला गेली. त्यानंतर नेपाळ बॉर्डरद्वारे ती सचिनला भेटली. मात्र, या दोघांना नंतर पोलिसांनी अटक केली व नंतर जामिनही मिळाला. 

पोलिसांनी सीमाकडून तीन आधारकार्ड जप्त केले आहेत. त्यातील एक तिच्या वडिलांचे, एक तिचं स्वतःच, आणि एक हैदरचं. त्यातील एक आधारकार्ड खरं होतं. त्याचबरोबर तिच्याकडे पाच मोबाइलही सापडले. त्यातील 3 फोन मुलांचे आहेत, एक पतीचा आणि एक स्वतःचा, असं स्पष्टीकरण सीमाने केले आहे.