जगातली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार! पुर्ण चार्जिंगवर 305 किमीपर्यंत धावणार; जाणून घ्या फीचर्स

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक प्रकारचे मॉडेल समोर येत आहेत. या

Updated: Oct 17, 2021, 02:16 PM IST
जगातली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार! पुर्ण चार्जिंगवर 305 किमीपर्यंत धावणार; जाणून घ्या फीचर्स title=

मुंबई : येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुगीचा असणार आहे. त्यामुळे जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक प्रकारचे मॉडेल समोर येत आहेत. यामध्ये जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कारकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. ही कारमध्ये दोन प्रवासी बसू शकतात.

कारची किंमत
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचे वेगवेगळे मॉडेल समोर येत आहेत. यामध्ये आता चीनी ऑटोमेकर Wuling Hongguang ने आपल्या स्थानिक बाजारात जगातील सर्वात छोटी आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉंच केली आहे. Nano EV असे या कारचे नाव आहे. या कारची किंमत 20 हजार युआन म्हणजेच 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे. कार सर्वात आधी 2021 मध्ये तियानजिन इंटरनॅशनल ऑटो एक्स्पोमध्ये देखील लॉंच करण्यात आली होती. Wuling Hongguang कंपनी मागील एका वर्षापासून या प्रोडक्टची मार्केटिंग करीत आहे.

भन्नाट फीचर्स
Wulingच्या Nano EV कारमध्ये EBD, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ABS ब्रेकसोबत स्पीड अलर्ट सिस्टिमआहे. कारला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, एसी, किलेस ऍंट्री सिस्टिम, LED हेडलाईट, 7 इचाची डिजिटल स्क्रिन आणि टेलीमॅटिक्स सिस्टिमदेखील आहे. 

100 किमी प्रति तास गती
दोन सिट्स असलेल्या या कारची लांबी 2497 mm,रुंदी 1526 mm आणि उंची 1616 mm आहे.  कारमध्ये 33 PS च्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. कारचा टॉप स्पिड 100 किमी प्रति तास आहे.

पूर्ण चार्जिंगसाठी वेळ
Wuling Nano EV कंपनी IO67 लिथियम-आयन बॅटरीचा उपयोग करते. ही बॅटरी 28 kWhआहे. ही छोटी कार एकदा चार्ज केल्यानंतर 305 किमीपर्यंत धावू शकते. तसेच 6.6KW AC चार्जरसह चार्ज केल्यास 4.5 तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते.