J&K : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक

दहशतवाद्यांचा आकडा अद्याप अस्पष्ट 

Updated: Jun 30, 2019, 04:43 PM IST
J&K : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक title=
छाया सौजन्य- एएनआय

श्रीनगर : रविवारी सकाळीच पुन्हा एकदा जम्मू- काश्मीर येतील बडगाम परिसरात गोळाबार झाल्याची घटना घडली. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असणारी चकमक पाहता त्यांच्यात गोळीबारही झाल्याचं वृत्त आहे. सकाळीच बडगाम जिल्ह्यातील चडूरा भागात ही घटना घडली. 

एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सुरक्षा यंत्रणा या दहशतवाद्यांना एकाच ठिकाणी खिळवून त्यांना कंठस्नान घालण्याच्या प्रयत्नांत आहेत. शिवाय संबंधित परिसरातून बाहेर निघण्याच्या संभाव्य वाटांवरही त्यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, या परिसरात नेमके किती दहशतवादी लपून बसले आहेत, हे मात्र अद्यापहीअस्पष्टच आहे.