शाहांचं 'मिशन ३६०'... 'सिक्रेट' बैठकीचं गुपित काय?

भाजप मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३० पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३६० पेक्षा जास्त लोकसभा जागा जिंकण्याचं लक्ष निश्चित केलंय.

Updated: Aug 18, 2017, 09:47 AM IST
शाहांचं 'मिशन ३६०'... 'सिक्रेट' बैठकीचं गुपित काय?  title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भाजप मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३० पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३६० पेक्षा जास्त लोकसभा जागा जिंकण्याचं लक्ष निश्चित केलंय.

'सिक्रेट' बैठक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकसभा निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. अमित शाह यांनी आपल्या स्टाईलने बैठक बोलविली. बैठकीचा अजेंडा गुप्त ठेवण्यात आला होता. कोणताही मंत्री, पदाधिकाऱ्याला बैठकीच्या विषयाची माहिती देण्यात आलेली नव्हती. २०१४ मध्ये ज्या जागा जिंकता आल्या नाही, अशा १५० जागा जिंकण्यासाठीची व्यूहरचना आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक घेण्यात आली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ३६० जागा जिंकण्याचे लक्ष समोर ही व्यूहरचना आली जात आहे.

- २०१४ मध्ये ज्या १५० जागा जिंकता आल्या नाहीत त्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांना देण्यात आलीय.

- प्रत्येक नेत्यावर ४ ते ५ मतदारसंघांची जबाबदारी असेल

- त्या नेत्याला मतदारसंघात आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत

बैठकीत शाह यांनी १० मिनिटांचं पॉवर पॉईंट प्रेजेंटेशन दिलं. या प्रेजेंटेशनमध्ये प्रत्येक राज्यातील जागांची माहिती देण्यात आली. पश्चिम बंगाल, उडीसा, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील राज्यांचा समावेश आहे. दर चार ममहिन्यांनी देशात सर्वे करण्याचा निर्णयही यावेळी अमित शाहांनी जाहीर केला. सर्व्हेमध्ये बंगाल आणि उडीसावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला चांगले यश मिळाले. परंतु २०१९ च्या निवडणुकीत मागील विजयाचा रेकॉर्ड तोडण्याचा चंग अमित शाह- नरेंद्र मोदी यांनी बांधला आहे. जीएसटी, शेतकरी कर्जमाफी, नोटबंदी या पार्श्वभूमीवर ३६० जागांवर विजयी होणे, हे भाजपसाठी आव्हान आहे. मात्र हे आव्हान मोदी-शाह यांनी स्वाकरल्याचे दिसते.