महाविद्यालयीन शिक्षण सोडणारा आता दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योजक

दाहव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उद्योपती गौतम अदानी यांची मोठी झेप

Updated: Oct 17, 2019, 11:39 AM IST
महाविद्यालयीन शिक्षण सोडणारा आता दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योजक title=

मुंबई : फोर्ब्सने जाहीर केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या दुसऱ्या क्रमांकावर इंन्फ्रास्ट्रक्चर टायकून गौतम अदानी आहेत. अवघ्या १८व्या वर्षापासून त्यांनी उद्योगास सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी चक्क महाविद्यालयीन शिक्षणाचा त्याग केला. त्यानंतर स्वप्नांच्या नगरीत स्वत:चा व्यवसाय सुरू केला. गत वर्षी जाहीर झालेल्या फोर्ब्सच्या यादीत ते १०व्या क्रमांकावर होते. 

गौतम अदानी आणि पत्नी प्रिती अदानी यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि छोट्या मुलाचे नाव जीत अदानी असे आहे. करणने अमेरिकेच्या Purdue University मधून अर्थशास्त्र विषयातून पदवी संपादन केली आहे. 

सध्या ते त्यांच्या वडिलांसोबत काम करत आहेत. १ जानेवारी २०१६ साली करण त्यांची नियुक्ती अदानी पोर्ट्स आणि एसईझेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. करण आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. अदानी ग्रुपच्या सर्व कामकाजाची जबाबदारी करण पाहत आहेत. 

त्याचप्रमाणे अदानी यांची पत्नी प्रिती अदानी, अदानी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्या अनेक अभियान राबवतात. फोर्ब्सने जाहीर केलेल्या आकड्यानुसार त्यांची संपत्ती १५.७ अब्ज डॉलर आहे. तर दाहव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उद्योपती गौतम अदानी यांनी मोठी झेप घेतली आहे.