धक्कादायक! बलात्कार पीडित तरुणीवर दुसऱ्यांदा अॅसिड हल्ला

 उत्तर प्रदेशमध्ये गुंडांची मुजोरी वाढतच चालल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. लखनऊमध्ये काही गुंडांनी एका तरुणीवर दुस-यांदा अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही तरुणी रायबरेलीची रहिवाशी असून लखनऊच्या अलीगंज भागातील हॉस्टेलमध्ये राहते.

Updated: Jul 2, 2017, 12:53 PM IST
धक्कादायक! बलात्कार पीडित तरुणीवर दुसऱ्यांदा अॅसिड हल्ला title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये गुंडांची मुजोरी वाढतच चालल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. लखनऊमध्ये काही गुंडांनी एका तरुणीवर दुस-यांदा अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही तरुणी रायबरेलीची रहिवाशी असून लखनऊच्या अलीगंज भागातील हॉस्टेलमध्ये राहते.

गुंडांनी हॉस्टेलमध्ये घुसून अॅसिड हल्ला केला. याच तरुणीवर 23 मार्चलाही असाच हल्ला झाला होता. रायबरेलीहून लखनऊला येत असताना गुंडांनी या तरुणीला अॅसिड पाजलं होतं. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तरुणीची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. पीडित तरुणीवर काही वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कारही झाला होता. या प्रकरणी रायबरेलीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी या तरुणीला धमक्या मिळत होत्या.