Video: वाहतूक कोंडीतून स्कूटी चालकाने काढला असा मार्ग, नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

Updated: Jun 21, 2022, 03:07 PM IST
Video: वाहतूक कोंडीतून स्कूटी चालकाने काढला असा मार्ग, नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात title=

Desi Jugaad Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी स्कूटी चालकाने वापरलेला मार्ग पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे. नेटकरी स्कूटी चालकाच्या कृतीला देसी जुगाड म्हणून संबोधत आहेत. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत स्कूटी चालक वाहतूककोंडीत अडकल्याचं दिसत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी स्कूटी चालक आपला देसी जुगाड वापरतो. अरुंद जागेतून स्कूटी काढण्याऐवजी ट्रकखालून स्कूटी काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर itz_saini_vimal या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हेवी ड्रायव्हर'. आतापर्यंत हा व्हिडीओ 27 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.