एकच धडा विद्यार्थ्यांना 6 वेळा शिकवला, शिक्षकाला 6 वर्षांची शिक्षा... वाचा नेमकं काय आहे प्रकरण

बायोलॉजी विषयाच्या शिक्षकाच्या कृती विद्यार्थी त्रस्त, शिक्षकाविरुद्ध चक्क पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

Updated: Jan 12, 2023, 10:26 PM IST
एकच धडा विद्यार्थ्यांना 6 वेळा शिकवला, शिक्षकाला 6 वर्षांची शिक्षा... वाचा नेमकं काय आहे प्रकरण title=

Trending News: शाळेत (School) घडलेल्या एका विचित्र घटनेची सध्या चांगलीच चर्चा आहे. एका शिक्षकाने (Teacher) एकच धडा सहा वेळा शिकवल्याने विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकाविरुद्धच तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल बाल कल्याण बोर्डापर्यंत पोहोचली. बोर्डाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना जाणूनबूजून त्रास दिला जात असल्याचं या तक्रारीत लिहिण्यात आलं आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) गुना इथल्या मॉडल स्कूलमधल्या (Model High School) 5 विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयाचे शिक्षक प्रदीप सोलंकी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले.  पोलीस अधिक्षकांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिक्षक प्रदीप सोलंकी यांच्याविरुद्ध पॉस्को (Protection of Children from Sexual Offences Act) कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर प्रदीप सोलंकी यांना अटक करण्यात आलं आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रदीप सोलंकी यांना 6 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांच दंड आकारण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांना दिला जात होता त्रास
मॉडल स्कूलमधल्या पाच विद्यार्थ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पण कोर्टात सुनावणीवेळी चार विद्यार्थ्यांनी यातून माघार घेतली. एक विद्यार्थिनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. या विद्यार्थिनीच्या जबाबावर कोर्टाने शिक्षिकाविरुद्ध निकाल दिला. 

मॉडल स्कूलमध्ये शिक्षक प्रदीप सोलंकी हे बायोलॉजिक विषय शिकवत होते. प्रदीप सोलंकी बायोलॉजीचा (biology) एकच धडा वारंवार शिकवत असल्याने विद्यार्थिनी त्रस्त झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी शिक्षक प्रदीप सोलंकी यांना विनंतीही केली. पण प्रदीप सोलंकी यांनी जाणूनबूजून तोच धडा वारंवार शिकवला. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांनी बाल कल्याण बोर्डाकडे तक्रार दाखल केली.