चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, INX मीडिया प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार

चिदंबरम यांना दिलासा नाहीच...

Updated: Aug 26, 2019, 02:58 PM IST
चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, INX मीडिया प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार title=

नवी दिल्ली : भ्रष्‍टाचाराच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. सीबीआयने चिंदबरम यांची कोठडी मागितली आहे. याच्या विरोधात चिदंबरम यांनी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. दुसऱ्या एका भ्रष्‍टाचाराच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात ईडीने देखील चिदंबरम यांची चौकशीसाठी कोठडी मागितली आहे. ईडीने आरोप केला आहे की, चिदंबरम यांनी परदेशात बनावट कंपन्या स्थापन करुन यातून भ्रष्टाचार केला आहे.

२१ ऑगस्टला चिदंबरम यांना सीबीआयने अटक करुन दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंट सीबीआय कोठडीत पाठवण्यात आलं होतं. सीबीआयने पी चिदंबरम यांची ५ दिवसांची कोठडी मागितली होती. २३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ईडीच्या प्रकरणात सोमवार पर्यंत त्यांना दिलासा दिला होता. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण सीबीआय प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला नव्हता.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी चिदंबरम सध्या सीबीआय कोठडीत आहेत. तर अटक झाल्यानंतर अटकपूर्व जामिनाची सीबीआयविरोधातली याचिका निरर्थक असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. जामिनासंदर्भात राऊज अव्हॅन्यू कोर्टात याचिका करावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तर जामिनाबाबत आपण सातत्याने प्रयत्न करत असतानाच आपल्याला अटक करण्यात आली असं चिदंबरम यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं आहे.

ईडीनंही चिदंबरम यांच्या कोठडीसाठी न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना सीबीआयकडून ईडीकडे सोपवण्यात येणार का याकडे लक्ष लागलं आहे.