SBI की Post Office? FD वर कोणाकडून मिळतो जास्त नफा

 SBI FD की पोस्ट ऑफिस बचत योजना? नक्की यापैकी कुठल्या योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं आहे

Updated: Aug 2, 2022, 10:57 AM IST
SBI की Post Office? FD वर कोणाकडून मिळतो जास्त नफा title=

SBI Vs Post Office -   तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची आहे, पण रिस्क घ्यायला घाबरता? तुम्ही फिक्स्ड डिपॉजिट स्कीमचा (Fixed Deposit Scheme) विचार करत आहात, पण कुठे गुंतवणूक करायची याबद्दल तुम्ही संभ्रमात आहात. फिक्स्ड डिपॉजिट हा गुंतवणुकीचा सर्वाधिक सुरक्षित पर्याय आहे. त्याशिवाय यातून हमखास रिर्टनची गँरेंटी असते. आजकाल प्रत्येक तरुण हा गुंतवणुकीचा विचार करतो. पण मार्केट रिस्कमुळे आणि अनेक ऑप्शन असल्याने त्यापैकी कुठला पर्याय योग्य आहे, हे समजणे कठीण आहे. सध्याच्या काळात FD मध्ये गुंतवणूक करायला लोकांचा कल दिसून येत आहे. 

पण SBI FD की पोस्ट ऑफिस बचत योजना? नक्की यापैकी कुठल्या योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं आहे, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. 

SBI बँकेची FD योजना 

स्टेट बँक ऑफ इंडियाने 14 जून 2022 मध्ये त्यांच्या FD चे व्याजदर बदलले आहेत. SBI ने 2 कोटींपेक्षा कमी  FD योजनेवर  7  दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत सर्वसामान्यांना 2.90% ते 5.50% पर्यंत व्याजदरची ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.40% ते 6.30% पर्यंत करण्यात आला आहे. आता आपण पाहूयात SBIच्या वेगवेगळच्या मुदतींवर नेमकां किती व्याजदर मिळतो ते.

7 दिवस ते 45 दिवस - 2.90%
46 दिवस ते 179 दिवस - 3.90%
180 दिवस ते 210 दिवस - 4.40%
211 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी - 4.60%
1 वर्ष ते 2 वर्षे - 5.30%
2 वर्षे ते 3 वर्षे - 5.35%
3 वर्षे ते 5 वर्षे - 5.45%
5 वर्षे ते 10 वर्षे - 5.50%

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम

पोस्ट ऑफिसच्या जमा केलेल्या म्हणजे FD योजनेला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणतात. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या टाइम डिपॉझिट खात्यांमध्ये 1 ते 5 वर्षांपर्यत पैसे जमा करु शकता. पोस्ट ऑफिस 1 ते 3 वर्षांच्या FD वर 5.5% व्याजदर देतो. तर 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 6.7% व्याजदर दिला जातो. 

SBI Vs Post Office कोण उत्तम? 

आता तुम्ही दोघांमधील तुलना केल्यावर तुमच्या लक्षात येईल पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे कधीही पण चांगले आहे. SBI ही 5 वर्षांच्या FD योजनेवर 5.5 टक्के व्याजदर देते. तर पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या FDवर 6.7 टक्के व्याज तुम्हाला देते. त्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिस योजनांमध्ये डोळे झाकून गुंतवणूक करु शकता.