मुंबई : SBI Debit Card PIN Generation : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी आईवीआर सिस्टम सुरु केली आहे. आता एसबीआय ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास न होता डेबिट कार्डचा नवीन पिन जेनरेट करता येणार आहे. त्यांना एक फोन कॉलने तुम्ही सहज करु शकता. यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरशिवाय दुसऱ्या मोबाइल नंबरने देखील नवीन पिन किंवा ग्रीन पिन जेनरेट करु शकतात.
एसबीआयने अलीकडेच आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत या सेवेची घोषणा केली आहे. त्यात म्हटले आहे की, 'तुम्ही टोल-फ्री आयव्हीआर प्रणालीद्वारे डेबिट कार्ड पिन किंवा ग्रीन पिन सहज तयार करु शकता. 1800 1234 वर कॉल करण्यास अजिबात घाबरु नका.
Here are the easy steps to generate your Debit Card PIN or Green PIN via our toll-free IVR system.
Don't hesitate to call 1800 1234.#SBI #StateBankOfIndia #SBIAapkeSaath #IVR #DebitCard #AmritMahotsav #AzadiKaAmritMahotsavWithSBI pic.twitter.com/1svqeBEAAe
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 27, 2022
एसबीआयने आपल्या संपर्क केंद्रांद्वारे हे काम सोपे केले आहे. या केंद्रांच्या IVR द्वारे ग्राहक डेबिट कार्ड पिन किंवा ग्रीन पिन तयार करु शकतात. यासाठी, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन टोल-फ्री क्रमांक 1800-11-22-11 किंवा 1800-425-3800 वर कॉल करावा लागेल. येथे कॉल केल्यानंतर, एसबीआय ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्ड संबंधित सेवांसाठी 2 दाबावे लागेल. यानंतर, पिन तयार करण्यासाठी 1 दाबावा लागेल.
जर तो नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन कॉल करत असेल तर 1 दाबावा लागेल. एजंटशी बोलण्यासाठी 2 दाबा. जर कोणी नोंदणीकृत मोबाइलवरून कॉल करत असेल तर 1 दाबल्यानंतर त्याला शेवटचे पाच अंक प्रविष्ट करावे लागतील. हे 5 अंक एटीएम कार्डचे असतील ज्यासाठी त्याला ग्रीन पिन तयार करायचा आहे. शेवटचे पाच अंक निश्चित करण्यासाठी पुन्हा 1 दाबावे लागेल. त्यानंतर, एटीएम कार्डचे शेवटचे पाच अंक पुन्हा टाकण्यासाठी 2 दाबावे लागेल.
यानंतर, तुम्हाला तुमच्या जन्माचे वर्ष प्रविष्ट करावे लागेल. यासह, SBI ग्राहकाचा ग्रीन पिन तयार होईल. हा पिन नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल. त्याचवेळी, 24 तासांच्या आत कोणत्याही एसबीआय एटीएमला भेट देऊन हा पिन बदलावा लागेल. जर अनेक CIF (ग्राहक माहिती फाइल) नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असतील, तर IVR संपर्क केंद्र एजंटला कॉल ट्रान्सफर करेल.