मोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Updated: Jan 28, 2022, 11:21 AM IST
मोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का title=

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे निलंबन असंविधानिक आणि बेकायदेशीर होतं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबन केले होते. हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

भाजपाचे १२ निलंबित आमदार -

  1. गिरीश महाजन
  2. जयकुमार रावल
  3. आशिष शेलार
  4. संजय कुटे
  5. अतुल भातखळकर
  6. पराग अळवणी
  7. राम सातपुते
  8. नारायण कुचे
  9. योगेश सागर
  10. अभिमन्यू पवार
  11. हरिश पिंपळे
  12. बंटी भांगडिया

 

आमदारांचे निलंबन रद्द का झाले?

1. आर्टिकल १९० (४) नुसार केवळ ६० दिवसांसाठीच आमदारांचे निलंबन करण्याचा नियम आहे. परंतु महाराष्ट्र सरकारनं १ वर्षासाठी निलंबन केलं. जे कायद्यानं चुकीचं आहे.

२. आमदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणून १ वर्षासाठी निलंबन करणं हा मतदारांवर अन्याय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.