SBI ने आपल्या १२०० बँकांमध्ये केला 'हा' मोठा बदल

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. जर 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 8, 2017, 03:49 PM IST
SBI ने आपल्या १२०० बँकांमध्ये केला 'हा' मोठा बदल  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. जर 

तुम्ही एसबीआय सोडून इतर कोणत्याही बँकांचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी देखील महत्वाची आहे. एसबीआयने हा बदल आपल्या सर्व शाखांमध्ये केलेला आहे. 
सर्व ग्राहकांनी ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा  ऑनलाईन ट्रान्सफर करता येणार नाही. त्याचप्रमाणे बँकेशी निगडीत असलेल्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला कळणार नाही. 

काय झाला आहे बदल? 

एसबीआयच्या देशभरात १२०० शाखा आहेत. या शाखांचे ब्रांच कोड आणि IFSC कोड सोबतच अनेक बदल केले आहेत. एवढंच नव्हे तर बँकेकडून काही शाखांची नावे देखील बदलण्यात आली आहे. अनेकदा आपल्याला बँकेचे डिटेल्स द्यायचे असतात त्यामुळे होणारे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. या सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे IFSC कोड. याशिवाय कोणताही फंड ट्रान्सफर होत नाही. जर तुम्हाला कुणा एसबीआय  कस्टमरच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असेल तरी देखील ही माहिती असण आवश्यक आहे. 

यासाठी एसबीआयने आपल्या १२०० शाखांमध्ये बदल केला असून एक लिस्ट जाहीर केली आहे. एका लिस्टमध्ये तुम्हाला जूनी ब्रांच आणि नवी ब्रांच असा बदल केला असून तिथे नवीन माहिती जोडली आहे.