SBI Cashback Credit Card: SBI चे कॅशबॅकसह क्रेडिट कार्ड, या ट्रिकने कमवा 6 हजार रुपये!

SBI Credit Card:  SBI ने ग्राहकांसाठी असे कार्ड लॉन्च केले आहे, ज्याच्या ऑफर्स जाणून तुम्ही देखील खूश व्हाल. हे SBI कार्ड लॉन्च केल्यानंतर ICICI Credit Card, HDFC Credit CArd आणि Axis Credit Card ला आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Updated: Sep 3, 2022, 10:43 AM IST
SBI Cashback Credit Card: SBI चे कॅशबॅकसह क्रेडिट कार्ड, या ट्रिकने कमवा 6 हजार रुपये! title=

मुंबई : SBI Cashback Credit Card: क्रेडिट कार्ड (Credit Card User) वापरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. SBI कार्डने नवीन 'कॅशबॅक SBI कार्ड' लॉन्च केले आहे.  (Cashback Sbi Card) हे कार्ड आता 5 टक्क्यापर्यंत कॅशबॅक देईल. विशेष गोष्ट अशी आहे की, कार्डधारकांना कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय सर्व ऑनलाइन खर्चावर 5 टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळेल. बाजारात अजूनही 5 टक्के कॅशबॅक देणारी कार्डे आहेत, परंतु त्यावर काही निर्बंध आहेत. उदाहरणार्थ, 5 टक्के कॅशबॅक तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यापाऱ्याकडे व्यवहार करता. SBI कार्डवरुन ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डवर इतका कॅशबॅक मिळेल की तुम्हाला एका वर्षात 6 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल.

अर्ज कसा करायचा?

SBI कार्ड्सने म्हटले आहे की, भारतभरातील ग्राहक, टियर-2 आणि टियर-3शहरांसह, 'SBI कार्ड स्प्रिंट' (SBI Card Sprint) या डिजिटल अ‍ॅप्लिकेशन प्लॅटफॉर्मद्वारे घरी बसून कॅशबॅक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात.  

कार्डसाठी किती चार्ज द्यावा लागेल? 

SBI ने स्पेशल ऑफर अंतर्गत मार्च 2023 पर्यंत कार्ड फी मोफत (Free) ठेवली आहे. यानंतर, एक वर्षासाठी कार्डचे नूतनीकरण शुल्क 999 रुपये असेल. तथापि, जर तुम्ही एका वर्षात या कार्डसाठी 2 लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला या कार्डचे नूतनीकरण शुल्क भरावे लागणार नाही.  

कॅशबॅक किती मिळेल?

कंपनीच्या मते, कॉन्टॅक्टलेस कार्ड पहिल्या वर्षी मार्च 2023 पर्यंत विशेष ऑफर म्हणून विनामूल्य आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही 'कॅशबॅक एसबीआय कार्ड'द्वारे 100 रुपये ऑनलाइन खर्च केले तर तुम्हाला अमर्यादित 1 टक्के कॅशबॅक मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही दरमहा  10,000 रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता. म्हणजेच, जर तुम्ही एका महिन्यात या कार्डद्वारे 10 हजार रुपयांचा व्यवहार केला तर तुम्हाला एका वर्षात 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या कार्डमध्ये तुम्हाला ऑटो क्रेडिटची सुविधा देण्यात आली आहे. या अंतर्गत, स्टेटमेंट जनरेट झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसात तुम्हाला तुमच्या SBI कार्ड खात्यात कॅशबॅक मिळेल.