Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात आहात, 'या'ठिकाणी 346 जागांसाठी भरती सुरू

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी... 'या' बँकेत  346 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू... लवकर करा अर्ज  

Updated: Oct 1, 2022, 09:30 AM IST
Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात आहात, 'या'ठिकाणी 346 जागांसाठी भरती सुरू title=

Sarkari Naukri in Bank 2022:   सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) भरती प्रक्रिया सुरु केली आहे. बँकेने वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेल्स हेड) आणि ऑपरेशन्स हेड-वेल्थ या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. उमेदवार www.bankofbaroda.in या लिंकवर  ऑनलाईन अर्ज करू शकता. (Bank Of Baroda Recruitment 2022) 

BOB recruitment 2022 vacancy details
वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेल्स हेड) आणि ऑपरेशन्स हेड-वेल्थच्या 346 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

कसं कराल अर्ज
- अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.
- वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला “Current Opportunities” सेक्शन दिसेल. 
- तुमच्यासमोर नवं पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही हव्या असलेल्या अर्जापुढे “Apply Now” क्लिक करा.
- यानंतर योग्य आणि अचूक माहिती भरा.
- पुर्ण झाल्यानंतर प्रिंटआऊट घ्यायला विसरु नका.

बँक ऑफ बडोदा भरती 2022 मध्ये, पदांनुसार वयोमर्यादा 21 वर्षे वरून 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. याशिवाय राखीव प्रवर्गाला शासनाच्या नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

यासाठी सीए, एमबीए, बीई, बीटेक, इंजिनीअरिंग, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा पदांनुसार शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. 

मुलाखत आणि अनुभवाच्या आधारे बँक ऑफ बडोदा भर्ती 2022 साठी उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक तपशीलांसाठी, तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकता.