मुंबई : उन्हाळा संपला असला तरी उन्हाचा तडाखा कायम आहे. युपी, दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश ते अगदी उत्तर प्रदेशातील लोक प्रखर उन्हामुळे हैराण आहेत. अनेक उन्हापासून वाचण्यासाठी पंखा-एसीचा सहारा घेत आहे. तर पाणी पिऊन लोक थकले आहेत.
पण एक अशी व्यक्ती आहे जी या प्रखर उन्हातही रजई घेऊन फिरत आहे. संतराम असे या व्यक्तीचे नाव आहे. हा इसम असा आहे ज्याला उन्हाळ्यात थंडी आणि थंडीत ऊन जाणवते. म्हणून या गर्मीच्या मौसमातही तो रजई, शाल किंवा ब्लॉकेंट घेऊन फिरतो. तर थंडीत फक्त बर्फाचे पाणी पितो. इतकंच नाही तर कधी बर्फाच्या लादीवर झोपतो. कुडकुडणाऱ्या थंडीत संतराम सकाळी ५ वाजता उठून तलावात अंघोळीला जातो. इतकंच नाही तर जानेवारी महिन्यात संतराम यांना खूप घाम येतो.
या अजब गजब प्रकारावर संतराम म्हणतो की, त्याला कोणताही आजार नाही. लहानपणापासूनच त्याचे शरीर असे आहे. संतरामला यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अनेकदा सन्मानित केले आहे आणि आर्थिक मदतही करत आहे.
यावर डॉक्टर म्हणतात की, संतरामसोबत जे काही होत आहे ते नैसर्गिक आहे. अनेक तपासण्या करुनही कोणत्याही आजाराचे निदान झाले नाही.