Sanjay Raut : आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता संजय राऊत 'भारत जोडो यात्रे'त सहभागी होणार

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'त (Bharat Jodo Yatra) आता शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) सहभागी होणार आहेत. 

Updated: Nov 22, 2022, 02:55 PM IST
Sanjay Raut : आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता संजय राऊत 'भारत जोडो यात्रे'त सहभागी होणार title=

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार  राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर 'भारत जोडो यात्रे'त (Bharat Jodo Yatra) आता शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) सहभागी होणार आहेत. याआधी माजी मंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) हे 'भारत जोडो यात्रे'त सहभागी झाले होते.  Bharat Jodo Yatra सहभागी होणार असल्याची माहिती खुद्द राऊत यांनीच दिली. (Maharashtra Politics)

 राहुल गांधी यांच्या सोबत 'भारत जोडो यात्रे'त मी सहभागी होणार आहे. तरुणाईला या यात्रेचे आकर्षण आहे, असे राऊत म्हणाले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात पोहोचली आहे. महाराष्ट्रात असताना या यात्रेत महाविकास आघाडीतील अनेक नेते सहभागी झाले होते. (अधिक वाचा - मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर) 

राहुल गांधी यांचा मला फोन

दरम्यान, मध्यप्रदेशातून ही यात्रा पुढे जाईल. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. मध्य प्रदेशात किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.  राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात. भारत जोडो यात्रेला त्यामुळे देशभरातूल समर्थन मिळत आहे. राहुल हे लोकांना आपलेसे वाटत आहेत. त्यांनी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपली विचारपूस केली. राहुल गांधी यांचा मला फोन येणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी यापूर्वी म्हटले होते. (अधिक वाचा -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी)

दिल्लीत राऊत यांचे स्वागत

तर दुसरीकडे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जेलमधून बाहेर पडल्यानंतर खासदार संजय राऊत पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते. राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले.

आम्ही लढत राहू...

सगळेच काही पळपुटे नसतात. आम्ही लढत राहू. मी अनेकवेळा एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती की, सीमा भागात जाऊन लोकांना भेटा पण ते गेले नाहीत. आत्ता काय दिवे लावणार आहात ?, असे थेट सवाल संजय राऊत यांनी केलाय. आमच्या लोकांवरील खटले मागे घ्या म्हणून कर्नाटक सरकारला सांगा. ते देशातच राहतात ते काय पाकव्याप्त कश्मीरात राहत नाहीत. शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचं मला समजले. पण त्या भेटीत काय चर्चा होतेय ते रेकॅार्डींग लोकांसमोर यायला हवं.
वकील उपस्थित राहणार नसतील तर  विधी व न्याय खात्यानं वेगळा निर्णय घ्यायला पाहीजे. मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्र्यांची भावना स्पष्ट नसेल तर वकील काय करणार
सीमा प्रश्न राजकीय प्रश्न आहे. राज्यपाल काहीही करु शकत नाही, असे राऊत म्हणाले.

'राज्यात आणि देशात परिवर्तन, सरकार पडणार'

राज्यात आणि देशात परिवर्तन घडवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेने एकत्र यायला पाहीजे. देशासाठी आदर्श असा फॅार्म्युला होऊ शकते. प्रकाश आंबेडकर जर सध्याच्या हुकूमशाही विरोधात उभे राहणार असतील उद्धव ठाकरेंची साथ असेल, असे राऊत म्हणाले. दानवे यांनी मध्यवधी निवडणूक संदर्भात संकेत दिले आहेत.हे सरकार 100 टक्के पडणार आहे याची खात्री आहे, असे राऊत म्हणाले.