महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ; सेलिब्रिटींनी बदलले आपले DP

कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत.  

Updated: May 11, 2020, 03:13 PM IST
महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ; सेलिब्रिटींनी बदलले आपले DP title=

मुंबई : देशात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढत आहे. कोरोना सारख्या धोकादायक विषाणूसोबत दोन हात करताना या वीरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहे. अशा कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत. आपल्या सोशल मीडियाचा DP बदलून सेलिब्रिटींनी महाराष्ट्र पोलिसांचं प्रतिक चिन्ह लावलं आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कप्तान विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी हाराष्ट्र पुलिस (Maarashtra Police) यांचा सन्मान करत आपले DP बदलले आहेत. 

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, क्रीडा आणि मनोरंजन जगातील सर्व मान्यताप्राप्त लोकांचे मनापासून आभार मानले आहेत. भारतात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसागणित वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा हा मोठा प्रश्न आता राज्य करकार आणि केंद्र सरकार पुढे येवून ठेपला आहे.