श्रीनगर : हिजबुलचा कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घातल्यानंतर भारतीय सेनेनं आणखीन एक हिजबुलचा कमांडर सबजार अहमद भट्ट याचं एन्काऊन्टर केलंय. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.
सबजार भट्ट बुरहानचा साथीदार असल्याचं सांगितलं जातयं. बुरहान ठार झाल्यानंतर सबजारला कमांडर बनवण्यात आलं होतं. सबजारसोबत आणखीन एक दहशतवादी मारला गेलाय. त्याचं नाव फैजान असल्याचं सांगितलं जातंय.
J&K: 2 terrorists killed, their dead bodies recovered & ascertaining their identities - DIG SP Pani on search Ops by forces in Saimu Tral pic.twitter.com/OGczkLXjgo
— ANI (@ANI_news) May 27, 2017
याशिवाय आज बारामुल्ला जिल्ह्यात उरीच्या रामपूर सेक्टरमध्ये एलओसीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार केलंय.
कालदेखील सुरक्षा दलानं उरीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत १० दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय. हे काश्मीरमध्ये भारतीय सेनेला मिळालेलं मोठ्ठं यश मानलं जातंय.
काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत १० दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय. हे काश्मीरमध्ये भारतीय सेनेला मिळालेलं मोठ्ठं यश मानलं जातंय.