रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे केली आत्महत्या

हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 16, 2017, 04:00 PM IST
रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे केली आत्महत्या  title=

नवी दिल्ली : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या न्यायालयीन समितीने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, रोहित वेमुलाने कॉलेज प्रशासनाला कंटाळून आत्महत्या केली नाही तर वैयक्तिक कराणांमुळे आत्महत्या केली होती.

रोहित वेमुला हा दलितच नव्हता तसेच त्याने विद्यापीठ प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या केली नसल्याचा निष्कर्ष या समितीने काढला आहे. इतकेच नाही तर, रोहित वेमुलावर दबाव आणल्याचा आरोप असलेल्या माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजप नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही न्यायालयीन समितीने क्लीन चीट दिलीय.

वैयक्तिक कारणांमुळे रोहित होता त्रस्त

अहवालात म्हटलं आहे की, रोहित वेमुला वैयक्तिक कारणांमुळे त्रस्त होता आणि खुशही नव्हता. रोहित वेमुलाने लिहीलेल्या सुसाइड नोटमधून स्पष्ट होतं की, त्याच्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने कोणालाही दोषी ठरवलेलं नाहीये. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या एकसदस्यीय न्यायालयीन समितीने हा अहवाल तयार केलाय. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. रुपनवाल या समितीचे प्रमुख आहेत.