रॉबर्ट वाड्रा निवडणूक लढवणार? काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले पोस्टर्स

काँग्रेस कार्यकर्त्यांनी राबर्ट वाड्रा यांनी निवडणूर लढवावी म्हणून मुरादाबादमध्ये पोस्टर्स लावले आहेत.

Updated: Feb 25, 2019, 11:25 AM IST
रॉबर्ट वाड्रा निवडणूक लढवणार? काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले पोस्टर्स title=

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा लवकरच राजकारणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. एवढंच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं पोस्टर देखील मुरादाबाद युवा काँग्रेसकडून लावण्यात आले आहेत. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तुमचं स्वागत आहे, अशाप्रकारचे पोस्टर येथे लावण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण एक दिवसापूर्वीच खुद्द वाड्रा यांनीच फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिल्याने आणि दुसऱ्याच दिवशी असे पोस्टर मुरादाबादमध्ये दिसून आल्यानं वाड्रा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. एकदा आपल्यावरील आरोप-प्रत्यारोपाचे प्रकरण संपले की लोकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आपली इच्छा आहे, असे वाड्रा यांनी म्हटले आहे.

एकदा आपल्यावरील आरोप-प्रत्यारोपाचे प्रकरण संपले की लोकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आपली इच्छा आहे, असे वाड्रा यांनी म्हटले आहे. एका दिवसाआधीच एका फेसबुक पोस्टमधून त्यांनी राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी मुरादाबादमध्ये युवक काँग्रेसकडून पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 'रॉबर्ट वाड्रा जी, मुरादाबाद लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यासाठी तुमचं स्वागत आहे. असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये वाड्रा यांनी म्हटलं आहे की, माझ्यावरील आरोप चुकीचे ठरल्यानंतर मला मोठ्या स्तरावर काम करायचं आहे. 

काही दिवसांपूर्वीच प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाच्या महासचिव बनवण्यात आलं आहे. पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.