तूच खरी रणरागिणी! कोणीही आलं नाही, 'ती' एकटी भिडली; CCTV Video तुफान व्हायरल

Crime News : रिया (Riya Agrawal) मदतीसाठी आरडाओरडा करत राहिली, मात्र कोणीही मदतीसाठी पुढं न आल्यानं चोरट्यांनी तेथून पळ काढला, मात्र...

Updated: Dec 11, 2022, 07:47 PM IST
तूच खरी रणरागिणी! कोणीही आलं नाही, 'ती' एकटी भिडली; CCTV Video तुफान व्हायरल title=
riya agrawal,CCTV Video

CCTV Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हादरवणारे असतात. तर काही व्हिडीओमधून आयुष्यभर लक्षात राहणारा सल्ला मिळतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान शेअर केला जात आहे. एका धाडसी मुलीने चोरट्यांना चांगलाच धडा शिकवला. संपुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Video) झाल्याचं पहायला मिळतंय. (riya agrawal confronts miscreants alone after seeing blood coming out of grandmother ear in meerut marathi crime news)

चर्चेत असलेली ही घटना मेरठच्या (Merath Crime News) लालकुर्ती भागातील आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रिया नावाच्या मुलीच्या आजीच्या कानातलं ओढून घेतलं. कानातलं हिसकावून चोरट्यांनी पळ काढला आणि रियाने एकटीनेच आजीच्या कानातल्यासाठी चोरट्यांनी (riya confronts miscreants alone) झुंज दिली. 

रिया (Riya Agrawal) मदतीसाठी आरडाओरडा करत राहिली, मात्र कोणीही मदतीसाठी पुढं न आल्यानं चोरट्यांनी तेथून पळ काढला, मात्र रियाने बदमाशांकडून एक कानातलं हिसकावून घेतलं.

आणखी वाचा - viral video: अमिताभ-रेखा यांच्या गाण्यावर नर्तकीसह वृद्ध इसमाच एक नंबर Dance, पाहणारेही झाले बेभान

वरुण अग्रवाल यांचे कुटुंब मेरठमधील लालकुर्ती पोलीस स्टेशन (Police Station) परिसरातील मैदा परिसरात राहते. मोदीनगर येथील रहिवासी असलेल्या वरुणची आजी संतोष या शनिवारी सायंकाळी नात रिया अग्रवालला घेऊन तिच्या घरी येत होत्या. त्यावेळी ही संपूर्ण घटना घडली.

पाहा Video -

दरम्यान, आजीची कानातले हिसकावत असल्याचं पाहून रियाने चोरट्यांशी हुज्जत घातली आणि चोर-चोर ओरडत चालत्या दुचाकीच्या गळ्याला दोनदा पकडलं. त्यानंतरही रियाच्या मदतीसाठी कोणी आलं नाही. रियाने झुमक्यांचा अर्धा भागही हिसकावून घेतला, मात्र रियाला धक्काबुक्की करत चोरटे पळून गेले. रियाच्या शौर्याचा हा प्रसंग घरात बसवण्यात आलेल्या (CCTV Viral Video) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.