इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी; RISAT-2B उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल.

Updated: May 22, 2019, 08:21 AM IST
इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी;  RISAT-2B उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण title=

चेन्नई: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी RISAT-2B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. इस्रोच्या पीएसएलव्ही ४६ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने बुधवारी सकाळी श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला. यानंतर ६१५ किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ५५५ किमी उंचीवर स्थिर करण्यात आला. पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही ४६ वी यशस्वी मोहीम आहे. RISAT मालिकेतील पहिला उपग्रह २० एप्रिल २००९ रोजी अवकाशात सोडण्यात आला होता.

RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल. त्यामुळे या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. RISAT-2B च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रो चंद्रयान-२ मोहीमेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.