नवी दिल्ली : देशातील काळे धन कमी करण्यासाठी नोटबंदी करण्यात आली होती. नोटबंदीनंतर रोख व्यवहारांवर चाप बसविण्याच्या हेतूने २ हजारांची नोट बाजारात आणली गेली.
२ हजारची नोट बाजारात आल्यानंतर वेगवेगळे तर्क यावर लढविण्यात आले.
तुम्ही २ हजारच्या नोटेवर काही लिहिले असेल तर कॅश काऊंटरवर नोट घेतली जाणार नाही अशीही बातमी पसरली होती.
त्यानंतर आरबीआयने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले.
पण आता २ हजारच्या नोटेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णयही काळ्या धनावर चाप बसविण्यासाठीच घेतला गेला आहे. देशातील सर्व बॅंकाना निर्देश जारी करण्यात आले आहेत.
यानुसार पुढच्या ३ महिन्यात नागरिकांना बॅंकामधून २ हजारपेक्षा कमी किंमतीच्या नोटाच मिळणार नाहीत. कारण आरबीआयने २ हजारच्या नोटेची छपाई बंद केली आहे. देशातील २ हजारची नोट कमी होत चालल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
खरतर, आरबीआयचा फोकस छोट्या नोटांवर आहे. त्यामूळे या आर्थिक वर्षात २ हजाराच्या आणखी नोटा छापल्या जाणार नाहीत. बॅंकांच्या कॅश काऊंटरमधून ग्राहकांना २ हजारची नोट न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तरीही २ हजार आणि पाचशे रुपयांची नोट एटीएममध्ये मिळणार आहे, त्यामूळे कोणता गोंधळ होणार नाहीए.