आरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Updated: Jul 28, 2017, 04:20 PM IST
आरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन title=

मुंबई : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.

यामागचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे नोटा मोजण्याची आणि नकली नोटा ओळखणारी मशीनच उपलब्ध नाही. आरबीआयनं अशा मशीन लीजवर घेण्यासाठी टेंडर जाहीर केलंय. परंतु, अद्याप कोणताही सप्लायर मशीन लीजवर देण्यासाठी पुढे आलेला नाही. याचमुळे आरबीआयला वारंवार या टेंडरची तारीख पुढे ढकलावी लागतेय. 

आरबीआय नोटा मोजण्यासाठी आणि नकली नोटा शोधून काढण्यासाठी वापर करते त्याचं नाव आहे 'करन्सी व्हेरिफिकेशन अॅन्ड प्रोसेसिंग सिस्टम' (CVPS)... या प्रकारच्या १८ मशीन्स खरेदी करण्यासाठी आरबीआयनं १२ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय टेंडर जाहीर केलं होतं. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून होती... परंतु, अर्जच न आल्यानं ही तारीख १६ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २२ जुलै रोजी जुनं टेंडर रद्द करत आरबीआयनं नवीन टेंडर जाहीर केलंय. याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट निर्धारित करण्यात आलीय.