मुंबई : Airtel आणि Vodafone-Idea नंतर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनेही (Reliance Jio) आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन किमती 1 डिसेंबरपासून लागू होतील. दरम्यान जिओने दावा केला आहे की या वाढीनंतरही, त्यांच्या प्लॅनच्या किंमती इतर टेलिकॉम कंपन्यापेक्षा कमीच राहतील.
जिओच्या विविध प्लॅनमध्ये 31 रुपयांपासून ते 480 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जिओ फोनसाठी खास आणलेल्या जुन्या 75 रुपयांच्या प्लॅनची नवीन किंमत आता 91 रुपये असेल. अमर्यादित 129 रुपयांच्या टॅरिफ प्लॅनसाठी आता तुम्हाला 155 रुपये मोजावे लागतील.
एका वर्षाचा वैधता प्लॅन यापूर्वी 2399 रुपयांमध्ये उपलब्ध होता परंतु आता यासाठी ग्राहकाला 2879 रुपये खर्च करावे लागतील. जिओच्या डेटा अॅड-ऑन प्लॅनचे दरही वाढले आहेत.
6 GB चा 51 रुपयांचा प्लॅन 61 वर उपलब्ध होणार आहे. 101 रुपयांचा प्लॅन 121 झाला आहे.