IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी

RC Bhargava Success Story: मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती

Pravin Dabholkar | Updated: Aug 31, 2023, 02:50 PM IST
IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी title=

RC Bhargava Success Story: आयएएस होण्यासाठी तरुण दिवसरात्र एक करुन अभ्यास करतात. या नोकरीत प्रतिष्ठीत पदासोबत चांगला पगार मिळतो. त्यामुळे आएएएस बनणे हे तरुणांसमोरचे अंतिम ध्येय असते. पण असेही एक व्यक्ती आहेत. ज्यांनी आपल्या स्वप्न पूर्ततेसाठी आयएएसच्या नोकरीवर पाणी सोडले. या निर्णयानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.पण आज ते 2.60 लाख कोटींची संभाळतात. आर. सी. भार्गव असे या व्यक्तिमत्वाचे नाव आहे. आपण त्यांच्या संघर्ष आणि यशाची कहाणी पाहणार आहोत.  

मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती. 60 वर्षांपूर्वी यूपीएससी परीक्षेतील ते टॉपर होते. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे आयएएस अधिकारी म्हणून सरकारी सेवा केली. सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. पैसा, पद, प्रतिष्ठा पायाशी लोळणं घालत होतं. पण आरसी भार्गव यांचा नोकरीत जीव रमत नव्हता. 

भार्गव यांनी आयएएस पदाचा राजीनामा दिला आणि देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते आतापर्यंत मारुती सुझुकीशी जोडले गेले आहेत. दरम्यान, त्यांना सरकारी नोकरीवर परतण्यास सांगण्यात आले. पण ते आपल्या घेतलेल्या निर्णयावर ठामच राहिले. 

'नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर', वडिलांच्या अटीनंतर निधी 'अशी' बनली IAS अधिकारी

ऑटो सेक्टरच्या विक्रीचे आकडे समोर येतात तेव्हा सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत मारुतीचे नाव अग्रस्थानी राहते. 1 लाख कोटी रुपयांचा महसूल पार करणारी ही कंपनी देशातील पहिली ऑटोमेकर ठरली आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांना जाते.

मारुतीच्या यशामागे आर.सी.भार्गव

आर. सी. भार्गव नसते तर कंपनी यशस्वी झाली नसती, असे जपानच्या सुझुकी कंपनीचे मालक ओसामू सुझुकी यांनी 2015 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते. यावरुन भार्गव यांच्या कार्याचा आवाका लक्षात येऊ शकतो. ओसामू सुझुकी भारतातील मारुती सुझुकीचे उत्पादन वाढविण्यासाठी चांगली निर्णय क्षमता असलेल्या व्यक्तीच्या शोधात होते. सरकारला देशातील लोकांना परवडणाऱ्या दरात कार उपलब्ध करुन द्यायची होती. यासाठी 1982 मध्ये भारत सरकारला मारुती सुझुकीच्या संयुक्त उपक्रमासाठी भागीदार हवा होता. 

IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या

मारुतीसोबत काम करण्यासाठी निर्णय 

आरसी भार्गव 1981 मध्ये मारुतीमध्ये रुजू झाले. त्यावेळी ते कंपनीचे तिसरे कर्मचारी होते. ते 1 वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर प्रशासकीय सेवेतून ते मारुतीमध्ये आले होते. परंतु त्यानंतर सरकारने त्यांच्या प्रतिनियुक्तीला मुदतवाढ देण्यास नकार दिला. अशावेळी आयएएसची नोकरी करायची की मारुतीमध्ये काम करायचे? हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. यावेळी त्यांनी आयएएस अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचा पर्याय निवडला. 

भार्गव यांना भारतातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असलेल्या कॅबिनेट सचिव बनण्याची संधी मिळाली होती. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला. या निर्णयामागे त्यांचे कमी पगार हे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. कारण त्यावेळी आयएएस अधिकाऱ्यांना दिले जाणारे वेतन खूपच कमी होते.