पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणेल वयातील अंतर; चाणक्य निती काय सांगते?

Chanakya Niti For Husband Wife Relationship: पती-पत्नीचे नाते हे नाजूक असतेय या नात्याबाबत चाणक्य निती काय सांगणे जाणून घ्या.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 31, 2023, 01:45 PM IST
पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणेल वयातील अंतर; चाणक्य निती काय सांगते? title=
Chanakya Niti says big difference in age of husband and wife dangerous

Age Gap between Husband and Wife: चाणत्य निती हा प्राचीन आचार्य चाणक्य यांच्या विचारधारांचा एक संग्रह आहे. आजच्या युगातही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नितीचा वापर केला जातो. आचार्य चाणक्य हे जगातील महान विद्वान होते. त्यांनी लिहलेली चाणक्य निती आजच्या युगातही चपखल लागू होते. अर्थशास्त्र, राजनिती, रणनिती याबरोबरच रोजच्या जीवनातही कसे वागावे याचे विचार सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचे नाते मजबूत होण्यासाठी व टिकवण्यासाठी काय करता येईल, हा चाणक्य यांनी सांगितले आहे. 

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्र चाणक्य नितीत पती-पत्नी यांच्यात किती अंतर असायला हवं याचेही मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर सन्मानजनक आयुष्य कसं व्यतित करावं याबाबतही जरुरी सल्ले दिले आहेत. जाणून घेऊया चाणक्य नितीत काय सांगितलं आहे. 

आचार्य चाणक्य म्हणतात की, पती-पत्नीच्या नात्यात दोघंही एकमेकांसोबत खुश आणि संतुष्ट असणं गरजेचं आहे. जर, पती-पत्नींमध्ये वयाचे अंतर अधिक असेल तर त्यांच्या विचारात साम्य असेल तसंच, त्यांच्या विचारातही फरक असेल. वयातील अंतर त्यांच्या शरीरासाठी व मनासाठीही चांगले नाहीये. जर एखाद्या वृद्ध पुरुषाने तरुण स्त्रीशी लग्न केले तर अशा विवाहात सामंजस्य राखणे कठीण होते. अशा परिस्थितीमुळे वैवाहिक जीवनात बाधा होते आणि लग्न तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा.

चाणक्य नितीनुसार, पती-पत्नीच्या नात्यात राग हा नुकसानदायी ठरतो. कधीकधी रागाच्या भरात बोललेला एखादा शब्द मोठ्या वादाला कारणीभूत ठरतो. त्यामुळं नातं तुटण्याची वेळही येते. रागात घेतलेला एखादा निर्णयामुळं नंतर पश्चात्तापाची वेळ येते.

पती-पत्नीचे नाते हे विश्वासावर आधारलेले असते. त्यामुळं दोघांनीही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवणे म्हणजे त्या विश्वासाला तडा गेल्यासारखे आहे. एकत्र राहण्यासाठी एकमेकांवर विश्वास असे आवश्यक आहे.

श्रीमंतासोबत उठबस टाळावी

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर एखाद्या गरीब व्यक्तीला अपमानास्पद वागणूक टाळायची असल्यास त्याने कधीही श्रीमंत व्यक्तींकडील मोठ्या कार्यक्रमाला जाऊ नये. तेथीच भव्यदिव्य वातावरण आणि आरामदायी जीवन बघून त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो. त्याचबरोबर अशा ठिकाणी त्याचा अपमान होण्याची दाट शक्यता असते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)