RBI कडून थर्ड पार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे आदेश...

MMFSL: आरबीआयकडून (RBI) थर्डपार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे एमएमएफएसएलला  (MMFSL) आदेश. जाणून घ्या काय आहे प्रकरण... 

Updated: Sep 23, 2022, 11:57 AM IST
RBI कडून थर्ड पार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे आदेश... title=

RBI: भारतीय रिझर्व बँकेने बँक (Reserve Bank of India) आणि फायनान्स कंपन्यांच्या रिकवरी करणाऱ्या थर्ड पार्टी संदर्भात नवीन नियम केले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशियल सर्विसेज लिमिटेड विरोधात आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. एमएमएफएसएल (MMFSL) थर्ड पार्टी एजेंटच्या मदतीने कर्जाची वसूली किंवा संपत्ती पुन्हा ताब्यात घेण्यासंदर्भात बंदी घातली आहे.

हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू असून तो पुढच्या आदेशापर्यंत लागू असेल. झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेच्या (27) मृत्यूनंतर आरबीआयने हा आदेश लागू केला आहे.

थर्ड पार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे आदेश 

भारतीय रिझर्व बँकेकडून (Reserve Bank of India) असं सांगण्यात आलं आहे की, एमएमएफएसएल (MMFSL) आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वसूल किंवा संपत्ती ताब्यात घेण्याचे कामकाज सुरु ठेऊ शकते. 'भारतीय रिझर्व बँकने आज... महिंद्रा अँड महिंद्रा फायनेंशियल सर्विसेज लिमिटेड (MMFSL), मुंबईला आउटसोर्सिंग व्यवस्थेच्या मदतीने कोणत्याही वसूली किंवा ताब्यात घेण्यासंदर्भात कामकाज तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.' 

एका कर्मचाऱ्याला अटक

आरबीआयने असं सांगितलं आहे की, ही कारवाई कथित एनबीएफसीच्या आउटसोर्सिंग व्यवस्थेच्या देखरेखीच्या चिंतांवर आधारित आहे. महिलेच्या मृत्यू संदर्भात पोलिसांनी महिंद्रा फायनांसच्या (Mahindra Finance) एका फर्म 'टीम लीज'च्या कर्मचाऱ्याला अटक केलं होतं. (MD & CEO at the Mahindra Group) महिंद्र ग्रुपचे सीईओ आणि एमडी अनीश शाह (Anish Shah) यांनी महिलेच्या मृत्यू संदर्भात शोक व्यक्त केला आणि या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल असा विश्वास दिला आहे. (PTI)