आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही होणार आधारला लिंक

 दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ही उपाययोजना लागू पडेल.

Updated: Jun 13, 2018, 01:04 PM IST
आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही होणार आधारला लिंक  title=

मुंबई : केंद्र सरकार आता तुमच्या ड्रायव्हिंग लायनन्सला आधार जोडण्याची तयारी करत आहे... ही गोष्ट उघड केलीय केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी... देहरादूनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा खुलासा केलाय. 

रस्ते निर्माण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही यासंदर्भात आपली चर्चा झाल्याचं रविशंकर यांनी म्हटलंय. यामुळे, रस्ते अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनाही मदत होणार आहे.

त्याशिवाय दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ही उपाययोजना लागू पडेल. कायदेमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीला स्वत:च नाव बदलता येईल पण तो फिंगरप्रिंट मात्र बदलू सरकारनं यासाठीही तयारी सुरू केलीय.  

उल्लेखनीय म्हणजे, गेल्यावर्षीही कायदेमंत्र्यांनी मोदी सरकार ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डाला जोडण्यावर विचार करत असल्याचं म्हटलं होतं. परंतु, मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं कल्याणकारी योजनांसोबत आधारला लिंक करण्याची योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा आदेश दिला होता.