Ravi Kumar Salary: 'या' भारतीयाचा पगार मुकेश अंबानींपेक्षाही जास्त! जॉइनिंग बोनस 6 कोटी

Ravi Kumar Cognizant CEO Salary: त्यांनी नव्या कंपनीमध्ये नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांचा एकूण पगाराचा आकडा हा मुकेश अंबानींच्या पगारापेक्षा चौपट असेल

Updated: Jan 17, 2023, 01:28 PM IST
Ravi Kumar Salary: 'या' भारतीयाचा पगार मुकेश अंबानींपेक्षाही जास्त! जॉइनिंग बोनस 6 कोटी title=
Cognizant CEO Ravi Kumar Salary

Cognizant CEO Ravi Kumar Salary: 'इन्फोसिस'चे (Infosys) माजी अध्यक्ष रवि कुमार एस (Ravi Kumar S) यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या 'कॉग्निझंट' कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा (Cognizant CEO) कार्यभार स्वीकारला आहे. रवि कुमार एस हे या कंपनीच्या बोर्ड सदस्यांमध्येही असतील असं सांगण्यात आलं आहे. रवि कुमार एस यांची ब्रायन हम्फ्रीज यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. 'कॉग्निझंट'मध्ये रुजू होण्यासाठी रवि कुमार एस यांनी घेतलेलं वेतन म्हणजेच सॅलरी पॅकेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रवि यांचा दिवसाचा पगार एवढा आहे की ते या पगारातून रोज एक महिंद्रा थार गाडी विकत घेऊ शकतील. रवि कुमार हे मागील 20 वर्षांपासून 'इन्फोसिस'मध्ये कार्यरत होते. सन 2016 पासून 2022 पर्यंत ते कंपनीचे अध्यक्षही राहिले. आता 'कॉग्निझंट' कंपनीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रवि यांच्या खांद्यावर असणार आहे. 

असा असेल सॅलरी ब्रेकअप

रवि कुमार यांना 'कॉग्निझंट'ने सात मिलियन अमेरिकी डॉलर्सचं पॅकेज दिलं आहे. भारतीय चलनानुसार आजच्या चलन दरानुसार ही रक्कम 56 कोटी 96 लाख 77 हजार 500 रुपये इतकी होती. विशेष म्हणजे रवि कुमार यांना जॉइनिंग बोनस म्हणून तब्बल सहा कोटी रुपये देण्यात आले आहेत. रवि कुमार यांना कंपनीने मूळ वेतन म्हणजेच बेसिक सॅलरी एक मिलियन डॉलर्स (8 कोटी 18 लाख 3 हजार 550 रुपये) देणार आहे. त्यांना वर्षाला दोन मिलियन डॉलर्स म्हणजेच 16 कोटी 36 लाख 7 हजार 100 रुपये कॅश इनसेंटिव्ह मिळणार आहे. त्याशिवाय कंपनी रवि यांना वन टाइम न्यू हायर अवॉर्ड म्हणून पाच मिलियन डॉलर्स म्हणजेच 40 कोटी 90 लाख 17 हजार 750 रुपये देणार आहे. ही रक्कम त्यांना जॉइनिंगच्या एका वर्षानंतर स्टॉक रिटर्नसच्या आदारावर मिळणार आहे. 

यापूर्वीच्या कोणत्या कंपन्यांमध्ये होते?

रवि कुमार हे 'इन्फोसिस'च्या आधी भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), ओरॅकल कॉर्परेशन (Oracle Cprice worporation) आणि 'प्राइस वॉटर हाऊस कूपर्स'मध्ये (PricewaterhouseCoopers) कार्यरत होते. सध्या 'कॉग्निझंट'मध्ये ब्रायन हम्फ्रीज हे 15 मार्चपर्यंत विशेष सल्लागार म्हणून कार्यरत असतील. कंपनीने सन 2020 मध्ये ब्रायन हम्फ्रीज यांना 13.8 मिलियन डॉलर इतकं वेतन दिलं होतं. 'इन्फोसिस'नेही रवि कुमार यांना मोठं पॅकेज दिलेलं. 'इन्फोसिस'ने सन 2021-22 च्या आर्थिक अहवालामध्ये रवि कुमार हे सीईओ सलिल पारेख आणि माजी सीओओ यू. बी. प्रवीण राव यांच्यानंतर सर्वाधिक वेतन घेणारे तिसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते, असं म्हटलं आहे.

पदाभर स्वीकारल्यावर रवि कुमार काय म्हणाले?

रवि कुमार यांच्यासमोर 'कॉग्निझंट'ने प्रामुख्याने इन-डिमांड सोल्यूशन्स आणि इंटरनॅशनल एक्सपान्शन म्हणजेच परदेशात उद्योग वाढवण्याचं ध्येय ठेवलं आहे. रवि यांनी 'इन्फोसिस'मध्ये चांगली कामगिरी केली होती. आता 'कॉग्निझंट'मध्ये त्यांच्याकडून कंपनीला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. रवि कुमार यांनी शिवाजी विद्यापिठामधून बॅचलर्सपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी झेवियर्स इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचं शिक्षण घेतलं. सीईओ म्हणून 'कॉग्निझंट'मध्ये नियुक्ती झाल्यानंतर रवी यांनी, "मी 'कॉग्निझंट'ला त्यांच्या व्यवसायामध्ये बदलण्यासाठी, डिजिटल पोर्टफोलियओ, क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आणि ग्राहकांबरोबर अधिक मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सर्व विषयांवर योग्य दिशेने पुढे जाण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत," असं रवि कुमार यांनी म्हटलं आहे.

अंबानींचा पगार किती?

रवि कुमार यांच्या या संपूर्ण सॅलरी ब्रेकअपचा विचार केला तर रवि कुमार यांचा पगार रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) पगाराच्या चौपट असणार आहे. अर्थात मागील दोन वर्षांपासून मुकेश अंबानी पगार (Mukesh Ambani Salary) म्हणून केवळ एक रुपया घेत आहेत. मात्र 2019-20 साली मुकेश अंबानींनी कंपनीकडून शेवटचा पगार घेतला होता तो 15 कोटी रुपये इतका होता.