Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; ...अन्यथा रेशन बंद होईल!

Ration Card Update : जर तुम्ही देखील रेशन कार्ड वापरून रेशन आणले तर तुम्ही ताबडतोब त्यात मोठे अपडेट करावे. जर तुम्ही ही माहिती अपडेट केली नाही तर तुम्हाला रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

Updated: Sep 27, 2022, 02:23 PM IST
Ration Card :  रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; ...अन्यथा रेशन बंद होईल!  title=

Online Ration Card Update : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे. (ration card online phone number update process)

तुम्ही शिधापत्रिकेच्या आधारे रेशन किंवा इतर सुविधाही घेत असाल तर तुम्हाला त्यातील महत्त्वाचा तपशील त्वरित अपडेट करावा लागेल. जर तुम्ही आत्तापर्यंत हा तपशील अपडेट केला नसेल  तर तुम्ही वेळ वाया घालवू नका. अन्यथा तुमचे रेशन बंद होऊ शकते.

हा महत्त्वाचा तपशील काय आहे

तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये आवर्जुन मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे. जर तुमच्या रेशनकार्डमधील जुना मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला रेशन घेताना किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना खूप त्रास सहन करावा लागेल. जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर रेशन कार्डवर अपडेट करावा लागेल. जर तुम्हाला या प्रक्रियेबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे ऑनलाइन रेशन कार्डमध्ये मोबाइल नंबर कसा अपडेट करायचा हे सांगणार आहोत.  

असा अपडेट करा नंबर -

- सर्वात आधी रेशन कार्ड वेबसाइट https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx वर जा.

- इथे Update Your Registered Mobile Number दिसेल.

- आता याखाली असलेल्या कॉलममध्ये तुमची माहिती भरा.

- त्यानंतर खालील कॉलममध्ये नवा मोबाइल नंबर, जो अपडेट करायचा आहे तो टाइप करा आणि सेव्ह करा.

- या प्रक्रियेनंतर मोबाइल नंबर अपडेट होईल.