Ratan Tata: अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने रतन टाटा भावुक

मित्र आणि जवळचा सहकारी गेल्याने रतन टाटा  खूप  भावुक झाल्याचं  पाहायला  मिळाला

Updated: Jan 2, 2023, 09:49 AM IST
Ratan Tata: अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने रतन टाटा भावुक  title=

Ratan Tata: रतन टाटा यांच्या अत्यंत खास आणि जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच दुःखद निधन झालय. टाटा ग्रुप (tata group) समूहामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावणारे आणि उच्च पदावर असणारे आर कृष्णकुमार यांचं रविवारी देहावसान झालं. (Ratan Tata very close person passes away in tata group mumbai )

मित्र आणि जवळचा सहकारी गेल्याने रतन टाटा  खूप भावुक झाल्याचं  पाहायला  मिळाला. रविवारी देहावसान झालं  टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांकडून याची माहिती देण्यात आली. कृष्णकुमार यांनी टाटा समूहात   बरीच वर्ष विविध पदांवर काम पाहिलं आहे यात  हॉटेल्सचा समावेश आहे इंडियन हॉटेल्स  मुख्य पदावर होते. कृष्णकुमार यांचा जन्म केरळमध्ये झाला होता . 

84 वर्षी निधन 

रतन टाटा यांच्या जवळच्या असणाऱ्या कृष्णकुमार यांच वयाच्या ८४ साली निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पदमश्री पुरस्कार विजेते कृष्णकुमार यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरचीच अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झालीच सांगण्यात आलं आहे .  

रतन टाटांना दुःख अनावर 

रतन टाटा आणि कृष्णकुमार यांनी बरेच वर्ष एकत्र काम केलं असल्यामुळे रतन टाटांच्या ते अत्यन्त जवळचे असे होते त्यांच्या जाण्याने रतन टाटा फारच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं . यावेळी रतन टाटा यांनी म्हटलंय कि,  कृष्णकुमार यांच्या निधनाने मला जे दुःख झालं आहे ते मी शब्दात मांडू शकणार नाही टाटा समूहात काम करताना जे नातं आमच्यात प्रस्थापित झालं ते आयुष्यभर समरणात राहील. ''

टाटा समूहाचे सच्चे सैनिक  

'' याचसोबत रतन टाटांनी म्हटलंय कि ''ते तट समूहाचे खरे सैनिक होते आयुष्यभर त्यांनी अत्यन्त प्रामाणिक पणे त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली.  

अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

टाटा संघाचे सध्याचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी  श्रदांजली वाहिली आहे, ते म्हणाले टाटा समूहात कृष्णकुमार यांनी खूप मोठं योगदान दिल आहे, त्यांच्या जाण्याने  दुःख झालं ''

केरळच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विट केलं कि, ''थलासेरी मध्ये जन्म झालेल्या कृष्णकुमार यांनी राज्य आणि समूहाचे संबंध मजबूत करण्यास खूप भर दिला त्यांच्या परिवारासोबत आम्ही आहोत'' असं म्हणाले.   (Ratan Tata very close person passes away in tata group  mumbai)