दुर्मिळ व्हिडिओ : ...जेव्हा मोदींनी घेतली अटलजींची गळाभेट!

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती खालावली असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Updated: Aug 16, 2018, 02:50 PM IST
दुर्मिळ व्हिडिओ : ...जेव्हा मोदींनी घेतली अटलजींची गळाभेट! title=

मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती खालावली असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या आठवड्याभरापासून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. एम्स रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, अटल बिहारी वाजपेयींची तब्बेत गेल्या २४ तासात अधिक खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. देशभरातून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

सध्या अटलजींची भाषणे, त्यांची वक्तव्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच त्यांच्या आवडत्या गोष्टींतून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच त्यांचा एक दुर्मिळ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अटलजींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात वाजपेयी चालत आहेत, तेव्हा त्यांची नजर नरेंद्र मोदींवर पडते. ते त्यांना जवळ बोलवतात. त्यावेळी मोदी धावत वाजपेयींजवळ जातात आणि त्यांची गळाभेट घेतात. मग वाजपेयी नरेंद्र मोदींची पाठ थोपटतात. कोणत्यातरी कामाची शाब्बासकी देत असल्यासारखे वाटत आहे. 

पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सहीत इतर नेते, समर्थक यांनी वाजपेयींची भेट घेतली.