अटलबिहारी वाजपेयींच्या या '5' निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. 

Updated: Aug 16, 2018, 03:10 PM IST
अटलबिहारी वाजपेयींच्या या '5'  निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा  title=

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. सध्या लाईफ़ सपोर्ट सिस्टिमवर असलेल्या अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहेत. वाजपेयींची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिल्लीच्या एम्स रूग्णालयाने सांगितले आहे.  तीन वेळेस अटलबिहारी वाजपेयींनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. मितभाषी असले तरीही अटलबिहारींच्या भाषणांनी एकेकाळी सार्‍या देशावर जादू चालवली होती. भारताला जागतिक स्तरावर खास स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या या '5' भूमिका आणि निर्णय फार  महत्त्वाच्या ठरल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ?

8% GDP  ग्रोथ 

1991 सालच्या नरसिंह राव सरकारच्या काळातील आर्थिक सुधारणा पुढील काळात कायम ठेवण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींची प्रमुख भूमिका आहे. 2004 साली मनमोहन सिंग यांनी जेव्हा वाजपेयी सरकारनंतर सत्ता सांभाळली तेव्हा ग्रोथ रेट 8% होता. महागाई दरही 4% कमी होता.  आर्थिक स्तरावर वाजपेयींनी घेतलेल्या भूमिकांमुळे भाजपालाही नवी ओळख  मिळाली. 

1. प्रायव्हेटायझेशन 

अटल बिहारी वाजपेयी व्यापार - उद्योग आणि सरकार यांच्या एकमेकांबाबतच्या भूमिकांबाबत स्पष्टता आणली होती. अ‍ॅल्युमिनियम कंपनी (BALCO) आणि हिंदुस्तान झिंक, इंडिया पेट्रोकेमिकल्स कॉरपोरेशन लिमिटेड आणि VSNL कंपन्यांचा समावेश होता. 

2. राजकोषिय तूट कमी  

वाजपेयी सरकारने राजकोषीय तूट कमी करण्यास महत्त्वाची भूमिका पार पडली. सार्वजनिक क्षेत्रातील सेव्हिंग्स सुधारायला मदत केली. 

3. टेलिकॉम क्रांती 

वाजपेयी सरकारने नवी टेलिकॉम पॉलिसी भारतामध्ये आणली. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांसाठी लायसंस फीज हटवून रेवेन्यू शेअरिंग व्यवस्था सुरू केली. वाजपेयी सरकारने आंतरराष्ट्रीय टेलिफोनमध्ये विदेश संचार निगम लिमिटेडच्या एकाधिकारशाहीला संपावले. यामुळे अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली.  

4. सर्वशिक्षा अभियान 

6-14 वयोगटातील मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण मिळावे याकरिता सामाजिक योजना सुरू करण्यात आल्या. 2001 साली वाजपेयी सरकारने सर्व शिक्षा अभियान लॉन्च केले. यामुळे शिक्षण  न मिळणार्‍या मुलांमध्ये 60% घट झाली. 

5.  स्वर्णिम चतुर्भुज आणि ग्राम सड़क योजना

अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे रस्स्त्यांचा विकास. स्वर्णिम चतुर्भुजमुळे चैन्नई,  कोलकत्ता, दिल्ली आणि मुंबईमध्ये हाय वे नेटवर्कसोबत कनेक्ट केले. ग्राम सडक योजनेमुळे गावातील पक्के रस्ते शहारांसोबत जोडले गेले. या प्रकल्पामुळे देशाच्या प्रगतीचा वेग सुधारला. 

अटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ?अटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ?