बलात्कारी राम रहिमच्या गुफेत सापडले कंडोम आणि...

 गुरमीत राम रहीम यांच्या संदर्भात अनेक अफवा समोर येत असताना आता एक खरी स्फोटक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने ही माहिती उघड केली आहे. 

Updated: Aug 31, 2017, 06:06 PM IST
बलात्कारी राम रहिमच्या गुफेत सापडले कंडोम आणि... title=

रोहतक :  गुरमीत राम रहीम यांच्या संदर्भात अनेक अफवा समोर येत असताना आता एक खरी स्फोटक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने ही माहिती उघड केली आहे. 

राम रहीम यांच्या गुहेमधून अनेक प्रकारच कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या सापडल्याची धक्कादायक माहिती बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली आहे. 

दरम्यान, डेरा येथील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य संन्यासी गुहेमध्ये एका तरूण स्त्रीला पाठविण्याचे आदेश देत होता. त्यानुसार तरूण साध्वींना गुफेमध्ये पाठविण्यात येत होते. 

सीबीआयच्या न्यायालयात राम रहीम यांच्यावरील बलात्कार प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्याला २० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.