भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत झपाट्यानं वाढ

भविष्यात भारताला पुन्हा तीच ओळख मिळणार आहे. कारण भारतातील अब्जधीशांची संख्या सध्या प्रचंड वेगानं वाढत आहे. 

Updated: Feb 25, 2021, 10:01 PM IST
भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत झपाट्यानं वाढ  title=

मुंबई : विविधतेनं नटलेल्या समृद्ध भारताचं सा-या जगाला अप्रूप आहे. भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक श्रीमंती जगजाहीर आहे. तसंच भारतातील गडगंज श्रीमंतांचा डंकाही आता जगभरात वाजू लागला आहे. भारताच्या श्रीमंतीचं पूर्वी जगाला आकर्षण होतं. भारताशी व्यापार करण्यासाठी पूर्वी जगभरातून व्यापारी भारतात यायचे. जगातलं संपन्न राष्ट्र अशी भारताची ओळख होती. 

भविष्यात भारताला पुन्हा तीच ओळख मिळणार आहे. कारण भारतातील अब्जधीशांची संख्या सध्या प्रचंड वेगानं वाढत आहे. नाईट फ्रँक इंडिया ही कंपनी दरवर्षी वेल्थ रिपोर्ट म्हणजेच संपत्ती अहवाल प्रसिद्ध करते. या कंपनीनं आपल्या यंदाच्या वार्षिक वेल्थ रिपोर्टमध्ये भारतात अब्जधीशांची संख्या वाढण्याचा वेग सर्वाधिक असल्याचं म्हंटलं आहे. त्यानुसार भारतात अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजेच अतिश्रीमंतांची संख्या पुढील चार वर्षांमध्ये 63 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

जगात इंडोनेशियामध्ये अब्जाधीशांची संख्या वाढण्याचा वेग सर्वाधिक आहे. इंडोनेशिया खालोखाल भारत दुस-या क्रमांकावर आहे. भारतात सध्या 6 हजार 884 अब्जाधीश आहे. पुढल्या 4 वर्षांत म्हणजेच 2025 पर्यंत भारतातील अब्जाधीशांचा आकडा 11 हजार 198 होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संपूर्ण जगात आजच्या घडीला 5 लाख 21 हजार 653 अब्जाधीश आहेत. 2025 पर्यंत ही संख्या 6 लाख 63 हजारच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. विशेश म्हणजे भारतात सध्या 113 खरबपती आहेत. हा आकडा २०२५ पर्यंत 162 वर पोहोचण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

ट्रेंडिग : मुंबई लवकरच बुडणार, अनेक संस्थांचा अभ्यासानंतर इशारा