नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय. सध्या वाजपेयी आजारी आहेत. वाजपेयींची त्यांच्या कृष्ण मेनन स्थित मार्गावरील निवासस्थानी जाऊन कोविंद यांनी वाजपेयी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतलीय.
यावेळी कोविंद यांच्यासह त्यांच्या पत्नीही होत्या. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अमित शाह यांनी नावाची घोषणा झाल्यानंतर कोविंद यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्यात. बुधवारी कोविंद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचीही भेट घेतली होती.
दरम्यान राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.