भीमा कोरेगाव वाद : 'आंतरजातीय विवाह हाच एकमेव मार्ग'

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव गावात झालेल्या हिंसाचारावर केंद्रीय सामाजिक न्याय तसंच सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिलीय. 

Updated: Jan 4, 2018, 11:23 AM IST
भीमा कोरेगाव वाद : 'आंतरजातीय विवाह हाच एकमेव मार्ग' title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव गावात झालेल्या हिंसाचारावर केंद्रीय सामाजिक न्याय तसंच सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिलीय. 

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसंच 'समाजातील जातीय हिंसेवर क्रांतीनं कधीही उत्तर मिळू शकत नाही... त्यासाठी शांतीच राखावी लागेल. गोष्टी बदलत आहेत. समाजात जातीय समरसतेसाठी सर्वात योग्य मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह... ' असं आठवले यांनी म्हटलंय. 

'माझं जीवन जाती जोडण्यासाठी आहे. बाबासाहेबांनी पत्नी सविता आंबेडकर ब्राह्मण समाजातून होत्या... माझीही पत्नी ब्राह्मण समाजातून आहे. मला वाटतं आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्यायला जायला हवं. मी जिथं जातो तिथं तरुणांना आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन देतो' असंही यावेळी आठवले यांनी म्हटलंय.