'या' दिवसाचे औचित्य साधत आयोध्येत राम मंदिरचे बांधकाम

अयोध्या विवादात्मक जागेवर अखेर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला.

Updated: Nov 11, 2019, 09:37 PM IST
'या' दिवसाचे औचित्य साधत आयोध्येत राम मंदिरचे बांधकाम title=

नवी दिल्ली : अयोध्या विवादात्मक जागेवर अखेर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. तर 'राम नवमी' दिनाचे औचित्य साधत आयोध्यामध्ये राम मंदिराच्या बांधकामाची सुरूवात पुढील वर्षी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

'राम नवमीच्या मुहूर्तावर राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाची सुरूवात होणार आहे. २ एप्रिल २०२० राम नवमी आहे आणि यापेक्षा चांगली तारीख असू शकत नाही' असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे. 

मंदिर तयार करण्यासाठी न्यायालयाने तीन महिन्यात ट्रस्ट तयार करण्याचे आदेश दिले होते. फेब्रुवारी महिन्यात हा कालावधी संपणार आहे. तोपर्यंत मंदिराचा आराखडा तयार केला जाईल. तारखेआधिच सरकारसोबत यासंबंधतीत चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.     

प्रसिद्ध मंदिर वास्तुकार चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केलेल्या आकृतीनुसार मंदिर साकारण्यात यावे अशी इच्छा विश्व हिंदू परिषदेने केली आहे. प्रसिद्ध मंदिर वास्तुकारांनी विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांच्या विनंतीवरून मंदिराची आकृती साकारली होती. त्यानंतर ही आकृती भाविकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.