Ayodhya Ram Mandir News in Marahti : अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Mandir Pran Pratishtha) ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अयोध्येचं छावणीत रुपांतर झालं आहे. प्रत्येक कोपऱ्यावर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. अशातच गुरुवारी 19 जानेवारीला दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) अयोध्येतून तीन संशयितांना गजाआड केलंय. (Ram Mandir Ayodhya ATS big operation Ramlalla pran pratishtha 3 suspects arrested uttar pradesh anti terrorist squad)
या संशियतांचा संबंध कॅनडात ठार झालेला सुक्खा दुनके, अर्श डल्ला टोळीशी असल्याचं उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलं. त्यांनी माहिती देताना सांगितलं की, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं अयोध्या जिल्ह्यात तपासणीदरम्यान तीन संशयित लोकांना अटक केली आहे. अयोध्येत हल्ला करण्याचा कट खलिस्तानी संघटना रचतायेत का? असा प्रश्न समोर आला आहे.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत 11,000 पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आहेत. व्हीआयपी सुरक्षेसाठी तीन डीआयजी, 17 एसपी, 40 एएसपी, 82 डीएसपी, 90 इन्स्पेक्टरसह 1,000 हून अधिक कॉन्स्टेबल आणि 4 कंपनी पीएसी तैनात केले आहेत. तर भाविकांना पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी 250 पोलीस मार्गदर्शक ठेवण्यात आले आहे.
शहरात मॅन्युअल एजन्सी तैनात करून तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतं आहे. एटीएस, एसटीएफ, पीएसी, यूपीएसएसएफसह यूपी पोलिसांचा मोठा फौजफाटा धाममध्ये तैनात आहे. तर एआय, ड्रोनविरोधी, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेय. यासोबतच सरयू नदी आणि घाटांवर एनडीआरएफची तुकडी तैनात आहे. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येत बार कोडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश सरकारनं ड्रोनची संख्या वाढवली असून ड्रोनद्वारे गस्त ठेवली जात आहे. शहरात सुरक्षा व्यवस्था कडक आहे. राज्य सरकारनं नाईट व्हिजन डिव्हाईस (NVD) आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण शहरातील हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. यापूर्वी, अयोध्या आयजी प्रवीण कुमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, आम्ही ड्रोनमध्ये एनव्हीडी, इन्फ्रारेड कॅमेरे आणि सीसीटीव्हीसह सर्व प्रकारचं तंत्रज्ञान सुरक्षेसाठी वापरत आहोत.