मुंबई : रविवारी सगळीकडेच रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. बहिण-भावाच्या नात्यातील अतूट प्रेम जपणारा हा सण. भावाने बहिणीची रक्षण करावी. याकरता बहिणी कृतज्ञतापूर्वक भावाच्या मनगटावर राखी बांधते. याच नात्यातील ओलावा जपलाय एका भावाने. रक्षाबंधनच्या अगोदरच भावाने बहिणीला आपली किडनी दान करून जीवनदानच भेट म्हणून दिली आहे.
31 वर्षीय रिया गेल्या पाच वर्षांपासून डायलिसिसवर जगत आहे. काही दिवसांपूर्वी तिची किडनी निकामी झाली. अशावेळी लगेचच प्रत्योरोपण करण्याची वेळ होती. मात्र कुणी किडनी डोनर मिळत नव्हता. या परिस्थितीत बहिणीची तब्बेत आणखी खालावत होती. अशावेळी भाऊच बहिणीसाठी धावून आला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला फक्त किडनीच मिळाली नाही तर आनंदी आणि सुदृढ आयुष्य देखील मिळालं आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये राहणारी रिया गेल्या महिन्यापासून दिल्लीतील आकाश रूग्णालयात दाखल आहे. एका आठवड्यातून तीन वेळा रियाचं डायलिसीस केलं गेलं. त्यानंतर तिची किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचा नवरा देखील तिला किडनी दान करू इच्छित होता. मात्र त्यांच रक्तगट एक नव्हतं. त्यानंतर तिच्या भावाची तपासणी करण्यात आली. त्यांचं रक्तगट एक होतं. पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. यादरम्यान एकच आव्हान होतं की, बहिणीचं हृदय ऑपरेशन दरम्यान फक्त 25 टक्केच काम करत होतं.
बहिणीने शरीरात केलेल्या बदलाला स्विकारलं आहे. किडनी डोनेट केल्यानंतर बहिणीचं हृदयही चांगल काम करत आहे. बहिणीला असलेल्या हाय ब्लड प्रेशरमुळे तिची किडनी निकामी झाली होती.