RAKSHA BANDHAN 2021 : रक्षाबंधनच्या मुहूर्तावर पंतप्रधनांना पाकिस्तानी बहिणीकडून आली खास भेट

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणाहून बहीणी राखीच्या रूपात आपले प्रेम पाठवत असतात. 

Updated: Aug 21, 2021, 09:17 AM IST
RAKSHA BANDHAN 2021 : रक्षाबंधनच्या मुहूर्तावर पंतप्रधनांना पाकिस्तानी बहिणीकडून आली खास भेट title=

मुंबई : रक्षाबंधन, भाऊ आणि बहिणीचा मुख्य सण 23 ऑगस्टला साजरा केला जाईल. भाऊ आणि बहिणींसाठी हा दिवस खूप खास आहे. या उत्सवासंदर्भात लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ -बहिणी मैलांचा प्रवास करून एकमेकांच्या घरी येतात.

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणाहून बहीणी राखीच्या रूपात आपले प्रेम पाठवत असतात. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी नरेंद्र मोदी अनेकदा महिलांना राखीबद्दल आपल्या मनाविषयी सांगतात.

एक महिला गेली 25-30 वर्षे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी पाठवत आहे. तसे, देशाच्या अनेक भागांतील महिला रक्षाबंधनासाठी पंतप्रधान मोदींना राखी पाठवतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख बऱ्याच काळापासून नरेंद्र मोदींना राखी बांधत आहेत.

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते, त्यावेळी पंतप्रधानांनी कमर मोहसीन शेख यांची भेट घेतली आणि तेव्हापासून त्यांनी प्रत्येक रक्षाबंधनाला नरेंद्र मोदींना राखी बांधण्याचे काम केले आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी मोदींच्या बहिणीने ही इच्छा व्यक्त केली

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी पीएम नरेंद्र मोदी यांना कमर मोहसीन शेख यांच्या वतीने राखी पाठवण्यात आली आहे. एएनआय शी बोलताना कमर मोहसीन शेख म्हणाल्या की, मी गेल्या 24-25 वर्षांपासून नरेंद्रभाई यांना राखी बांधत आहे.यावेळीही मी राखीबद्दल उत्साहित आहे.

यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. जुने दिवस आठवत त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींसोबत त्यांचे पहिले रक्षाबंधन होते. जेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता होते.