राखीला पाहून राम रहीम म्हणाला होता, 'तू खूपच..'

बॉलीवुडची स्फोटक अभिनेत्री राखी सावंत सध्या भलतीच चर्चेत आली आहे. बाबा राम रहीमबाबत तिने केलेला एक खुलासा हे त्या चर्चेचे कारण आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 24, 2017, 03:38 PM IST
राखीला पाहून राम रहीम म्हणाला होता, 'तू खूपच..' title=

नवी दिल्ली : बॉलीवुडची स्फोटक अभिनेत्री राखी सावंत सध्या भलतीच चर्चेत आली आहे. बाबा राम रहीमबाबत तिने केलेला एक खुलासा हे त्या चर्चेचे कारण आहे.

राखी सावंत हिने बाबा राम रहीमच्या डेऱ्याला भेट दिली होती. या वेळी तीने राम रहीमच्या त्या बहुचर्चीत आणि तितक्याच गूढ गुहेतही प्रवेश मिळवला होता. या गुहेत तिची आणि बाबा राम रहीमची भेट झाली होती. या भेटीत बाबा बाबा राम रहीमने राखीला तू खूपच चांगली मुलगी असल्याचे म्हटले होते. खुद्द राखी सावंत हिनेच याबाबत एका मुलाखती दरम्यान, खुलासा केला आहे. स्थानिक चॅनलचे सीईओ जगदीश चंद्र यांना दिलेल्या एक्सक्लूसिव मुलाखतीत राखीने ही माहिती दिली आहे.

मुलाखती दरम्यान राखी सावंतने म्हटले की, पाठीमागील तीन, चार वर्षांपासून, तिची राम रहीम आणि हनीप्रीतसोबत चांगली ओळख होती. राम रहीमसोबत अनेक वेळा भेट झाल्याचा दावाही राखीने केला आहे. बाबांनी आपल्याला राजकारणात जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच, राखीने पुढे म्हटले आहे की, राम रहीम आपल्याला सिरसा येथील डेऱ्यात घेऊन गेले. तिथे ते मला त्या गुहेतही घेऊन गेले. बाबांसोबत माझी इतकी जवळीक पाहून हनीप्रीत घाबरून गेली. तिला असे वाटत होते की, मी तीची सवत बणू नये, असेही राखीने म्हटले आहे.

दरम्यान, राखीने मुलाखतीत पुढे म्हटले की, मला माहित नव्हते की बाबा रेप करतात आणि लोकांना नपुंसक बनवतात. जेव्हा मला बाबांच्या कृत्याबाबत माहिती समजली तेव्हा मी आश्चर्याने धक्कच झाले.