Rakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला दमदार return, तुमच्या portfolio मध्ये आहे का?

या कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत सुमारे 106 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. 

Updated: Aug 4, 2022, 02:47 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला दमदार return, तुमच्या portfolio मध्ये आहे का? title=

Rakesh Jhunjhunwala Portfoilo: Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या मेट्रो ब्रँड्स लिमिटेड (metro brands limited) या शेअरमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. मंगळवारपर्यंत (2 ऑगस्ट) गेल्या 5 business session मध्ये हा शेअर 32 टक्क्यांहून अधिक वाढला. बुधवारच्या व्यवहारात वरच्या स्तरावरून काही प्रमाणात नफावसुली दिसून आली. या कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत सुमारे 106 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. Q1FY23 च्या निकालांनंतर brokerage firm ICICI securities ने metro brands च्या shares मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 

राकेश झुनझुनवाला यांची metro brand footwear या रिटेल कंपनीत 14.4 टक्के हिस्सेदारी आहे. metro brands limited (MBL) ही गेल्या दहा वर्षांत देशातील सर्वात वेगाने वाढणारी फुटवेअर रिटेल कंपनी आहे. कंपनीचा पोर्टफोलिओ खूप दमदार आहे. ICICI securities नुसार पहिल्या तिमाहीत (Q1FY23) कंपनीच्या महसुलात 26 टक्के (QoQ) वाढ झाली आहे. एकूण margin हे 59.7 टक्के आणि EBITDA margin 36 टक्के होते. 

काय आहे नवे टार्गेट? 
ICICI securities ने metro brands च्या shares मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिल्यानंतर target price 850 रुपये per share करण्यात आली आहे. 2 ऑगस्ट 2022 रोजी शेअरची किंमत 763 रुपयांवर close झाली. सध्याच्या किमतीच्या तुलनेत स्टॉकमध्ये सुमारे 12 टक्के वाढ होऊ शकते. या वर्षी बाजारात अनिश्चितता असूनही शेअरमधील गुंतवणूकदारांना आतापर्यंत सुमारे 67 टक्क्यांचे रिटर्न्स मिळाले आहेत. 

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यामार्फत metro brands मध्ये हिस्सा खरेदी केला आहे. जून 2022 पर्यंत रेखा झुनझुनवाला यांचे कंपनीमध्ये एकूण holding 14.4% (39,153,600 इक्विटी शेअर्स) आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 32 स्टॉक्स असून त्यांची एकूण संपत्ती 25,425.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. झुनझुनवाला यांना शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हटले जाते. किरकोळ गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवतात.

(Disclaimer : येथे गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही झी मीडियाची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.)