नवी दिल्ली : आज देशातल्या 6 राज्यांमध्ये 25 जागांसाठी मतदान होतंय. त्यात सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेशच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणूकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
उत्तरप्रदेशात एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं निवडणूकीत युती केली आहे. त्यामुळे या जागेसाठी मोठी चुरस होणार आहे. तिकडे कर्नाटकमध्ये 4, पश्चिम बंगालमध्ये 5 जागांवर तर केरळमध्ये 3 जागांसाठी मतदान होणार आहे.
राज्यसभेच्या एकूण 58 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी 33 उमेदवारांची 15 मार्चला बिनविरोध निवड झाली. त्यात महाराष्ट्रातल्या 6 खासदारांचाही समावेश आहे. आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे.