PM मोदी यांचा मोठा निर्णय! 'राजीव गांधी खेल रत्न' अवार्डचे नाव बदलले

खेलरत्न पुरस्कारांबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Aug 6, 2021, 02:05 PM IST
PM मोदी यांचा मोठा निर्णय! 'राजीव गांधी खेल रत्न' अवार्डचे नाव बदलले title=

नवी दिल्ली : खेलरत्न पुरस्कारांबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पूरस्कार राजीव 'गांधी खेल रत्न पुरस्कारा'चे नाव बदलून आता 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, ऑलंपिक खेळांच्या बाबतीत भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नांमुळे सर्वांना गर्व वाटतो. विशेषतः हॉकीमध्ये आपल्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवली, जिंकण्यासाठी जी मेहनत घेतली ते आताच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले की, देशाला गर्व प्रदान करणाऱ्या क्षणांमध्ये देशवासीयांच्या आग्रहाखातर खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंदजी यांना समर्पित केले जाईल. भारतीयांच्या भावनांचा सन्मान करीत खेलरत्न पुरस्काराचे नाव यापुढे 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' करण्यात येणार आहे. जय हिंद

मेजर ध्यानचंद भारताच्या त्या अग्रणी खेळाडूंपैकी एक होते की, ज्यांनी भारताला सन्मान आणि गर्व दिला. देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मानही त्यांच्याच नावाने असावा.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने 1991-92 मध्ये  राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरू करण्यात आला होता.